'एकनाथ खडसे यांना काही काम नाही, ते इकडे-तिकडे फिरतात', कुणाची टीका?

‘एकनाथ खडसे यांना काही काम नाही, ते इकडे-तिकडे फिरतात’, कुणाची टीका?

| Updated on: Jun 06, 2023 | 7:58 AM

VIDEO | एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीवर कुणाची सडकून टीका?

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. या दोघांकडूनही एकमेकांवर पातळी सोडून टीका केली जात आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांचे डोकं तपासून घ्यायला पाहिजे असा सल्ला त्यांनी त्यांना दिला होता. तर त्यांच्या त्या टीकेनंतर गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले की, एकनाथ खडसे सध्या काहीही काम करत नाहीत. त्यामुळे टीका करणे हे काम करत असले तरी ते सध्या इकडे तिकडे कोण काय म्हणाले, कोण नाराज आहेत, कोण काय स्टेटमेंट करत आहे हेच ते बघत आणि ऐकत फिरत असतात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

Published on: Jun 06, 2023 07:42 AM