उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारा काळ अधिक बिकट, ‘या’ भाजप नेत्यानं केली भविष्यवाणी
VIDEO | येणाऱ्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, नेमकं काय म्हणाले बघा व्हिडीओ?
जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातारणात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना पश्चाताप करायला ही वेळ मिळणार नाही, भाजपसोबत निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भाजपसोबत असलेली युती तोडली आणि ही युती तोडूनच आयुष्यातील खूप मोठी चूक केल्याचे भाष्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारा काळ अधिक बिकट असेल त्यांच्यासोबत काहीच राहणार नाही फक्त त्यांचे नाव त्यांच्या सोबत राहणार असल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी केली आहे. कारण आता शिवसेना पक्ष गेला आहे, पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव देखील गेलेलं आहे. त्यामुळे आगामी काळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी कठीण असलयाचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 19, 2023 07:06 PM
Latest Videos