रामनवमीच्या मिरवणुकीत गिरीश महाजन बेधुंद नाचले; बघा तुफान डान्सचा व्हिडिओ
VIDEO | रामनवमीच्या मिरवणुकीतील मंत्री गिरीश महाजन यांच्या डान्सचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
जळगाव : जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना डान्स करण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहास्तव गिरीश महाजन यांनी भन्नाट डान्स केला. गिरीश महाजन यांनी केलेला बेधुंद डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जामनेरमध्ये रामनवमीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गिरीश महाजन देखील उत्साहात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी डीजे व ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत गिरीश महाजन यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून गिरीश महाजन यांनी तुफान डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले. यापूर्वीही गिरीश महाजन यांच्या डान्सची चर्चा झाली होती जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन, फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असताना डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती, यावेळी देखील त्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला होता तर धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात हिट धुळे फिट धुळे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी गिरीश महाजन यांनी झुंबा डान्स केल्याचे पाहिले पाहायला मिळाले होते.