कधी राख रांगोळी होईल सांगता येत नाही, भाजप नेत्याचा एकनाथ खडसे यांना सूचक इशारा

कधी राख रांगोळी होईल सांगता येत नाही, भाजप नेत्याचा एकनाथ खडसे यांना सूचक इशारा

| Updated on: May 29, 2023 | 12:39 PM

VIDEO | तुम्ही राष्ट्रवादीत गेल्याने काय फरक पडला ? भाजप नेत्यानं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना थेट सवाल

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. नुकताच ईडी चौकशीवरून गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर पटलवार पाहायला मिळाला आता आज पुन्हा यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या पुन्हा एकदा नाव घेता टीका केल्याचे समोर आले आहे. तुम्ही राष्ट्रवादीत गेल्याने काय फरक पडला? असा सवालच त्यांनी खडसे यांना केला आहे. तर कधी राख रांगोळी होईल सांगता येत नाही, असा सूचक इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलाय. तर सर्व मी केलं असं आम्ही म्हणत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले. ते असेही म्हणाले की, मला सांगायच आहे की कार्यकर्त्यांमुळे आपण मोठं आहोत. कोणीच मोठा नाही इथे पक्ष मोठा आहे.आपण सर्व कार्यकर्त्यांना संधी देत आहोत, असेही ते म्हणाले.

Published on: May 29, 2023 12:39 PM