बुलेट चालवत गिरीश महाजन सावरकर गौरव यात्रेत सहभागी, बघा व्हिडीओ
VIDEO | शेकडोच्या संख्येने कार्यकर्तेही सावरकर गौरव यात्रेत भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह मोटरसायकल रॅलीत सहभागी
जामनेर, जळगाव : सावरकर गौरव यात्रेनिमित्त जामनेर मध्ये भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोटरसायकल रॅलीत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन हे देखील सहभागी झाले होते . गिरीश महाजन यांनी बुलेट चालवत या सुमारे 5 किमी रॅलीत सहभाग घेतला. तर शेकडोच्या संख्येने कार्यकर्तेही या मोटरसायकल रॅली त सहभागी होऊन हातात भगवे झेंडे व सावरकरांचा जयघोष करत ही मोटर सायकल रॅली काढण्यात आली. शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने 30 मार्चपासून राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. आज 6 मार्च रोजी भाजपचा वर्धापन दिन असल्याने शहरातून सावरकर गौरव रॅली काढून तिचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिली. तर मी या रॅलीचा भाजप कार्यालयापासून प्रारंभ झाला असून सुभाष चौक चित्रा चौक मार्गे सावरकर यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता होणार आहे. दरम्यान या रॅलीमध्ये गिरीश महाजन हे बुलेट चालवत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.