प्रायश्चित भोगावच लागणार, बोंबा मारून उपयोग नाही; महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंनी जो दगा फटका केला. त्याचं प्रायश्चित भोगावच लागणार असून आता बोंबा मारून उपयोग नाही, असंही ते म्हणाले. जामनेर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अनिल केऱ्हाळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव: शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तू तू मै मै सुरू आहे. या दोन्ही गटात जुंपलेली असतानाच आता भाजपनेही (bjp) त्यात उडी घेतली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) शिवसेना फितूर झाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे केलं त्याची फळ त्यांना भोगावीच लागणार आहेत. 50 पैकी 40 आमदार गेले. 18 पैकी 12 खासदार गेले तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं? आता नावासाठी, धनुष्यबाण चिन्हासाठी भांडत आहेत. काल-परवा ग्राउंडसाठी भांडत होते. उद्या परवा ते आता शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या करतील, अशी बोचरी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली. उद्धव ठाकरेंनी जो दगा फटका केला. त्याचं प्रायश्चित भोगावच लागणार असून आता बोंबा मारून उपयोग नाही, असंही ते म्हणाले. जामनेर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.