Phone Tapping प्रकरणावर Girish Mahajan यांचे भाष्य

| Updated on: Mar 05, 2022 | 7:33 PM

संजय राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागले, तेव्हा त्यांची ओळख झाली, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता.

नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या (phone tapping) आरोपावर भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. ज्या वेळेस आमची सत्ता होती, तेव्हा संजय राऊत कुठे होते? संजय राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागले, तेव्हा त्यांची ओळख झाली, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता. त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागले, असा टोलाही महाजन यांनी लगावला. गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत असताना राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.