Gopichand Padalkar | एसटीतील वसुलीचा पैसा थेट मातोश्रीवर जातो : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | एसटीतील वसुलीचा पैसा थेट मातोश्रीवर जातो : गोपीचंद पडळकर

| Updated on: Nov 10, 2021 | 5:08 PM

एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशाकडून महिन्याला 21 कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा मातोश्रीत जातो, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशाकडून महिन्याला 21 कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा मातोश्रीत जातो, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात शेकडो आंदोलक जमले असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. यावेळी पडळकर यांनी एसटीतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. एसटी महामंडळाकडून एक रुपया प्रत्येक प्रवाशावर कर आकारला जातो. एसटीने रोज 65 लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. रोज 65 लाख महिन्याचे झाले किती? 21 कोटी… वर्षाचे झाले किती..? पैसे जातात कुठे? हे पैसे मातोश्रीत जातात. एढा हे भ्रष्टाचार करतात. कर्मचाऱ्यांना काहीच देत नाही, असा आरोप पडळकर यांनी केला.