‘आदित्य आणि उद्धव ठाकरे हे गोंधळलेले पात्र’, ‘या’ नेत्यानं केली सडकून टीका
VIDEO | आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गोंधळलेले पात्र, हातातून सत्ता गेल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले; कोणत्या मंत्र्यानं केला हल्लाबोल
मुंबई : आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गोंधळलेले पात्र आहे. हातातून सत्ता गेल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून ते असे वक्तव्य करतात. एकीकडे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगावर बोलायचं मात्र यांच्या बाजून जेव्हा निर्णय येतात तेव्हा कोर्टाच्या बाजूने बोलायचं. यावरून ते किती गोंधळलेले आहेत हे दिसते. मात्र आता त्यांच्या बोलण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र फरक पडत नाही, असे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटले तर आता शिंदे-फडणवीस सरकार ज्या पद्धतीने काम करतंय तसं काम उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षात करता आलं नाही, कोरोनामध्ये त्यांना लोकांचे जीव वाचवता आले नाहीत, चक्रीवादळ आलं यावेळी कोणतीही मदत पोहोचवली नाही. मात्र आता हे सरकार तात्काळ निर्णय घेतंय, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Published on: Apr 13, 2023 04:20 PM
Latest Videos