'अन् ते गडबडून गेले त्यांना काही कळायचं बंद झालं होतं', गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

‘अन् ते गडबडून गेले त्यांना काही कळायचं बंद झालं होतं’, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

| Updated on: Sep 09, 2023 | 5:14 PM

VIDEO | पुण्यश्लोक अहिल्या देवींच नाव बारामती मेडिकल कॉलेजला दिल्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल, बघा नेमकं काय म्हणाले?

हिंगोली, ९ सप्टेंबर २०२३ | घोंगडी बैठकीच्या निमित्ताने भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे दोन दिवस हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाला दुग्ध अभिषेक घालून दर्शन घेत पडळकर यांनी हिंगोली जिल्ह्यात घोंगडी बैठकीला सुरुवात केली आहे. पडळकर हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले आहेत, यावेळी त्यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथे समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली, बारामती मेडिकल कॉलेजला शरद पवारांचे नाव द्यायचे होते, सरकारी मालमत्ता म्हणजे त्यांना स्वतःची जहागिरी वाटत होती, पुण्यश्लोक अहिल्या देवींच नाव बारामती मेडिकल कॉलेजला दिल्यानंतर शरद पवार गडबडून गेले होते, त्यांना आठवडाभर काही कळायचं बंद झालं होतं, याबद्दल आपण गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देऊ त्यांच्यामुळे बारामतीमध्ये एवढी मोठी वास्तू उभी राहिली, अशी खोचक टीका पडळकर यांनी शरद पवारांवर आपल्या भाषणादरम्यान केली.

Published on: Sep 09, 2023 05:14 PM