पावसात भिजूनही तुमचे 54 च्यावर आमदार निवडून आले नाहीत, Gopichand Padalkar यांचा शरद पवारांना टोला
पडळकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि सांगलीतील जिल्हा बँकेच्या राजकारणावरुन देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत, असं देखील पडळकर म्हणाले.
सांगली : विधानसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येईल याचा विचार शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या नेत्यांनी करू नये, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलंय.शरद पवार यांनी एकच विचार करावा, कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येऊ हे त्यांनी ठरवाव, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली आहे. पडळकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि सांगलीतील जिल्हा बँकेच्या राजकारणावरुन देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत, असं देखील पडळकर म्हणाले.
Latest Videos