Gopichand Padalkar | बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर मैदानात, 20 ऑगस्टला सांगलीत होणार शर्यत

Gopichand Padalkar | बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर मैदानात, 20 ऑगस्टला सांगलीत होणार शर्यत

| Updated on: Aug 14, 2021 | 3:14 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय. पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. 

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.