आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

| Updated on: Oct 04, 2024 | 1:59 PM

इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नावर थेट उत्तर दिलीत.

इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांवर अखेर आज शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल भाष्य केलं. या पत्रकार परिषदेवेळी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, त्यांनी पत्रकारांच्या पश्नावर देखील थेट उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. भाजपमध्ये गेल्यावर तुम्हाला चांगली झोप लागली, असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. मात्र आता पुन्हा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची तुतारी हाती घेतली आहे. पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. या पत्रकारपरिषदेत एका माध्यमाच्या प्रतिनिधीने हर्षवर्धन पाटलांना आता शांत झोप लागेल का? असा सवाल केला. यावर हर्षवर्धन पाटलांनी एका शब्दात उत्तर देत नो कमेंट असं म्हटलं आणि यावर अधिक बोलणं टाळलं.

Published on: Oct 04, 2024 01:59 PM