शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईंची गुलामी, शिंदे गटावर कुणाचा घणाघात
शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईंची गुलामी केली नसती असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे, या टीकेवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले... गेले कित्येक वर्ष ठाकरे गटाचे खासदार असून शरद पवार यांची गुलामी करत आहे.
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : श्रद्धा आणि भाव असता तर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईंची गुलामी केली नसती असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या राड्यावर बोलताना राऊत म्हणाले, जे झालं ते सोडून द्या. काल जे झालं ते ट्रेलर आहे. आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केलाय. ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे हे भाजपची गुलामी करताय असा आरोप संजय राऊत यांनी केला. हा मोठा विनोद आहे. गेले कित्येक वर्ष ठाकरे गटाचे खासदार असून शरद पवार यांची गुलामी करत आहे. हिंदुत्वाचा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुंटीला बांधलेत. बाळासाहेबाची शिवसेना तुम्ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे नेली’, असा हल्लाबोलही चढवला.