Kirit Somaiya | छगन भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता जप्त, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा

| Updated on: Aug 25, 2021 | 8:57 AM

राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज सकाळी 7 वाजता ट्विट करत त्यांनी आयकर विभागाकडून भुजबळांची 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभाग (इन्वेस्टिगेशन) मार्फ़त सेशन कोर्ट मुंबईत दावा दाखल करत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती देखील मिळत आहे. किरीट सोमय्या, आणि माहिती अधिकार कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.