मिस्टर नटवरलाल, हिसाब तो लेकर रहेंगे; किरीट सोमय्या यांचा अनिल परब यांना इशारा

मिस्टर नटवरलाल, हिसाब तो लेकर रहेंगे; किरीट सोमय्या यांचा अनिल परब यांना इशारा

| Updated on: Feb 01, 2023 | 10:46 AM

सोमय्या vs परब वाद सुरूच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना काय केलं चॅलेंज?

मुंबई : म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले असा आरोप अनिल परब यांनी केला होता. या आरोपाला किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या म्हणाले, कार्यालय म्हणून कोण ही जागा वापरत होतं. अनधिकृत जागेची कुणाची मालकी असते? असा सवाल सोमय्यांनी केला असून म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांना एमआरटीपीवर खटला दाखल करा असे सांगितले. जून २०१९ मध्ये अनिल परब यांनी नोटीस दिली होती, त्यांना जाग यायला ३६ महिने लागले. हिसाब तर लेकर रहेंगे. याच नटवरलाल अनिल परब यांनी दापोली साई रिसॉर्टमध्ये माझा काही सबंध नाही, असे सांगितले होते. नटवरलालवर सहा गुन्हे दाखल झाले आहेत, भ्रष्टाचार करून हॉटेल गाळे बांधले त्याचा हिशोब तर द्यावाच लागणार असं आवाहन सोमय्यांनी अनिल परब यांना केलं आहे.

 

 

 

Published on: Feb 01, 2023 10:46 AM