Kirit Somaiya : ‘आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी…’, सोमय्यांचा हल्लाबोल; दादर हनुमान मंदिरासंदर्भात काय केला दावा?
मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरून आता वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दादर हनुमान मंदिर पाडणार नाही, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं, असा मोठा दावाही किरीट सोमय्यांनी केला.
मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरून आता वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे मंदिर बेकायदा बांधकाम असून ते रेल्वेच्या जमिनीवर बांधण्यात आल्याची नोटीस मध्य रेल्वे प्रशासनाने मंदिर ट्रस्टला दिली आहे. रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी हे मंदिर हटवावे लागणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीव उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि भाजपच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजप हिंदुत्वाच्या नावावर मते मागते मात्र बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत गप्प आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर मुंबईत मंदिरे पाडल्याची चर्चा आहे, त्यावरही भाजप गप्प का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पलटवार करत मोठा दावा केला आहे. दादर हनुमान मंदिर पाडणार नाही, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं, असा मोठा दावाही किरीट सोमय्यांनी केला. तर मंदिराला चुकीनं नोटीस पाठवलं असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केलाय.