Kirit Somaiya | टीम 11 वर कारवाई करा : किरीट सोमय्या

| Updated on: Aug 30, 2021 | 10:05 PM

सोमय्यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावं आहेत.

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aaghadi) हल्लाबोल केला आहे. सोमय्यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावं आहेत. याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, “ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला”