ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; सोमय्या यांनी ‘कमबॅक’ करत दिला थेट इशारा, करणार नवा धमाका
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | मुंबई महानगरपालिकेतील कोविड सेंटर घोटाळा गाजत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या असून हा ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. याचदरम्यान आता भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. तर त्यांनी थेट ठाकरे गटालाच इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी महानगरपालिकेतील आणखीन एक ठाकरे गटाचा घोटाळा बाहेर काढू असे म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन आता वाढले आहे. तर सोमय्या हे आता कोणता घोटाळा बाहेर काढतात हे पाहावं लागेल.
Published on: Aug 08, 2023 08:08 AM
Latest Videos