किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता उद्धव ठाकरे यांचे ‘हे’ निकटवर्तीय, थेट 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
VIDEO | किरीट सोमय्या यांचा 500 कोटींच्या घोटाळ्याचा नवा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीला थेट जेलचा इशारा
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 500 कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा नवा बॉम्ब टाकत मोठा गोप्यस्फोट केला आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर थेट 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. “खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांचे पार्टनर राजू चहावाला हे जेलमध्ये गेले. आता नंबर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचा आहे. उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांनी आता तयारी करावी”, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. “रवींद्र वायकर यांनी 500 कोटींचा फाईव्ह स्टार हॉटेल घोटाळा केला आहे”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तर संबंधित आरोपांप्रकरणी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय जेलमध्ये जातील, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय.
Published on: Mar 04, 2023 08:54 PM
Latest Videos