Kirit Somaiya : ‘त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन…’, किरीट सोमय्या यांना फेसबुकवरून कोणाची धमकी?
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना फेसबुक पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे. युसूफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने किरीट सोमय्या यांना धमकी दिल्याची माहिती मिळतेय
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना एक धमकी मिळाली आहे. फेसबुक पोस्टवरून किरीट सोमय्या यांनी ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळतेय. युसूफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्ट करत किरीट सोमय्या यांना धमकी दिल्याची माहिती मिळतेय. तर येत्या ८ तारखेला किरीट सोमय्या यांच्या घरी आंदोलन करणार असल्याचाही इशारा या धमकी देणाऱ्या युसूफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने दिला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी पवईमध्ये मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावरून आंदोलन केलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्या यांना युसूफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्ट करत धमकी दिल्याचे समोर आले आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी या धमकीवर भाष्य करताना म्हणाले की, ‘मुंबई सारख्या शहरात चार हजार अनाधिकृत भोंगे आहेत. त्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोषणा केली आणि सांगितले की अनधिकृत भोंगे चालणार नाही. असे असताना मला कोणीतरी फेसबुक पोस्टकरून धमकी देतो. मी अशा फालतू गुंडांना घाबरत नाही’, असे किरीट सोमय्या म्हणाले.

नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
