Kirit Somaiya | धनंजय मुंडेंनी हिंदू मंदिरांची जागा हडपली, हिशोब द्यावाच लागेल, सोमय्यांचा हल्लाबोल

Kirit Somaiya | धनंजय मुंडेंनी हिंदू मंदिरांची जागा हडपली, हिशोब द्यावाच लागेल, सोमय्यांचा हल्लाबोल

| Updated on: Dec 18, 2021 | 12:33 PM

हा धनंजय मुंडें गोरगरीब आहे का? जगमित्र साखर कारखान्यात घोटाळा केला, 83 कोटी आले कुठून, हिंदू मंदीरांची जागा हडपली, हिशोब तर द्यावाच लागेल, मुंडे जबाब द्या, असं किरीट सोमय्या म्हणाले.

माझी कोल्हापूरला जाताना जी अडवणूक झाली त्याबाबत मी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणात गेलो होतो, आत्ता प्राधिकरणाने सीपी मुंबई पोलीस, एसीपी मिलिंद खेतले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावे नोटीस जारी केल्या आहेत. पोलीस लवकरच पिंजऱ्यात असणार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. हा धनंजय मुंडें गोरगरीब आहे का? जगमित्र साखर कारखान्यात घोटाळा केला, 83 कोटी आले कुठून, हिंदू मंदीरांची जागा हडपली, हिशोब तर द्यावाच लागेल, मुंडे जबाब द्या, असं किरीट सोमय्या म्हणाले. रोहीत पवारांच्या यांच्या माफीला विचारतोय कोण?, माफी मागण्याची वेळ अजित पवारांची आहे. अजित पवार यांनी कुटूंबियांचा नावाने बेनामी संपत्ती गोळा केली, 1050 कोटींची अजित पवारांची बेनामी संपत्ती जप्त झाली, पार्थ पवार, रोहित पवार काय आणि शरद पवार काय?, त्यांच्या आरोपांना कोण घाबरतंय, असं सोमय्या म्हणाले.