'पूर्वग्रह दूषित असलेली माणसं राजकारणात बिबा घालताय', शरद पवार यांच्यावर कुणाची अप्रत्यक्ष टीका?

‘पूर्वग्रह दूषित असलेली माणसं राजकारणात बिबा घालताय’, शरद पवार यांच्यावर कुणाची अप्रत्यक्ष टीका?

| Updated on: Sep 07, 2023 | 4:39 PM

VIDEO | 'कष्टातून वर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे काम शेवाळलेले नेते जोरकसपणे करतात', माजी मंत्री आणि भाजपचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांची भाजपच्या प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्यानंतर हल्लाबोल

सोलापूर, ७ सप्टेंबर २०२३ | ‘पूर्वग्रह दूषित असलेली काही माणसं देशाच्या राजकारणात बिबा घालण्याचे काम करतात’, अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली. माजी मंत्री आणि भाजपचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांची नुकतीच भाजपच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवक्तेपदाचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आलं. प्रवक्ते पदी नियुक्त झाल्यानंतर लक्ष्मण ढोबळे यांनी शरद पवार यांच्यावर ही टीका केली. तर कष्टातून वर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे काम शेवाळलेले नेते जोरकसपणे करतात. प्रादेशिक पक्षाचे नेते नातवाचा सातबारा मजबूत करण्यासाठी देशाच्या राजकारणाला तिलांजली देतात. शरद पवार यांच्यासोबत चाळीस वर्षे काम केलेल्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि नव्याने भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी आज शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published on: Sep 07, 2023 04:39 PM