तर मी जिंकलोच, रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत

तर मी जिंकलोच, रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत

| Updated on: Apr 07, 2024 | 1:45 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यात रस्सीखेच होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री नारायण राणे यांच्याकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गात स्वतःच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. महायुती, महाविकास आघाडी, ठाकरे गट, काँग्रेस पक्षांकडून जागावाटप काही झाले आहेत. तर काही ठिकाणी युतीच असल्याने जागावाटप रखडल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यात रस्सीखेच होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री नारायण राणे यांच्याकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गात स्वतःच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातील ८ तालुके ३ मतदारसंघ राजापूर चौथा आहे. या ४ विधानसभा मतदारसंघात लीड मिळाला तर मी जिंकलोच, असे वक्तव्य करत नारायण राणे यांनी केलं आहे. तर रत्नागिरी-चिपळूणमधून दोन लाखांनी लीड मिळेल, असा विश्वास देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Apr 07, 2024 01:45 PM