'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; नितीन गडकरी काय म्हणाले?

‘शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते’; नितीन गडकरी काय म्हणाले?

| Updated on: Sep 30, 2024 | 11:27 AM

'उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. शासन ही विषकन्या असते', नितीन गडकरी यांनी असे वक्तव्य केले. पुढे ते असेही म्हणाले की, सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे

सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे. त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नाही, असे भाजप नेते, मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तर गुंतवणुकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते, असं वक्तव्यही नितीन गडकरी यांनी केले आहे. ‘उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. शासन ही विषकन्या असते. कुठल्याही पक्षाची असली तरी ज्याच्या भरोसावर असते, त्याला उध्वस्त करते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका’, असे नितीन गडकरी म्हणाले. तर सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे. विदर्भात मोठे गुंतवणूक आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून कोणी हाती लागत नसल्याची खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 500 हजार कोटीची गुंतवणूक करायला कोणी तयार नाही विदर्भात मिहान सारखे प्रकल्प आणले. उद्योजक जमिनी विकत घेतात मात्र युनिट सुरू करत नाही, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

Published on: Sep 30, 2024 11:27 AM