Pankaja Munde Video : ‘बारामतीत मला दरमहिन्याला बोलवत जा कारण…’, पंकजा मुंडे अजितदादांना नेमकं काय म्हणाल्या?
बारामतीत कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरूवात होत आहे. हे कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.
बारामतीतील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर बोलताना त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. ‘आज अजितदादांबरोबर काम करत असताना माझ्या जीवनातील सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नाही. तीन चार कप चहा पिण्यात गेली. डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकून गेली.’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तर अजित पवार यांच्या वक्तशीरपणा आणि शिस्तीबद्दल बोलतना त्या म्हणाल्या, ‘मला अजित पवार म्हणाले आपण पावणे आठला भेटू. पण मला वहिनींचा फोन आला की आपण सव्वा सातला तयार रहा आणि साडे सातलाच या… मला यायला सात एकतीस झाले होते. पण दादा आधीच गाडीत बसले होते. मी पळत गाडीत बसले. मला असं वाटलं. बारामतीत दरमहिन्याला मला बोलवा, कारण इथलं Professionalism मला शिकता येईल’. बारामतीत कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरूवात होत आहे. हे कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. हे कृषी प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे.