ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याच्या वक्तव्यानं चर्चा
लवकरात लवकर गृहविभागाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत. 4 जूननंतर पराभव होणार हे निश्चित आहे, हे कळल्यानंतर ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे, असे म्हणत ठाकरे कुटुंबीयांवर भाजप नेत्यानं जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे याचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं. तर परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार येतंय, हे उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांच्या तोंडावर बारा वाजले आणि आज सकाळी संजय राऊत यांच रड गऱ्हाणं बघून लक्षात आलंय, असं म्हणत भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. पुढे नितेश राणे असेही म्हणाले, लवकरात लवकर गृहविभागाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत. 4 जूननंतर पराभव होणार हे निश्चित आहे, हे कळल्यानंतर ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे, असे म्हणत ठाकरे कुटुंबीयांवर नितेश राणेंनी जोरदार निशाणा साधला आहे.
Published on: May 21, 2024 04:42 PM
Latest Videos