उद्धव ठाकरे बिकाऊ माणूस, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता, असा मोठा गौप्यस्फोट सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केला. यावरच भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात, केसरकर जे बोलले त्याला समर्थन दिलंय
सिंधुदुर्ग, ७ फेब्रुवारी २०२४ : मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही, पण उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता, असा मोठा गौप्यस्फोट सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केला. यावरच भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात, केसरकर जे बोलले त्याला समर्थन असल्याचे नितेश राणे म्हणाले, तर उद्धव ठाकरे हे बिकावू माणूस आहे. दीपक केसरकर यांच्या या आरोपांमुळे ठाकरे यांच्या पैसे घेण्यावर शिक्कामोर्तब झालंय, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केलाय. ज्यावेळी शिवसेनेची बैठक झाली होती. तेव्हा नारायण राणे यांनी विधानसभा, लोकसभा आणि जिल्हापरिषदेसाठी इतके पैसे उद्धव ठाकरे घेतात, असं रेट कार्डच जारी केल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.