Nitesh Rane : 'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले, '...त्यांना योजनेतून वगळा'

Nitesh Rane : ‘लाडकी बहीण’ संदर्भात नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले, ‘…त्यांना योजनेतून वगळा’

| Updated on: Dec 11, 2024 | 3:49 PM

nitesh rane on Ladki bahin yojana : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी मागणी केली आहे. नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद करा असं वक्तव्य केलं आणि एकच खळबळ उडाली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि २३७ जागांवर आमदार निवडून आलेत. या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. अशातच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी मागणी केली आहे. नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद करा असं वक्तव्य केलं आणि एकच खळबळ उडाली. नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आणि विनंती करणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावा. या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्या आणि २ अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या असे निकष या योजनेत टाका, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हटले की, हा फक्त ट्रेलर आहे जेव्हा हिंदू समाज पूर्ण पिक्चर दाखवेल तेव्हा तुम्हाला तुमचा अब्बा आठवेल, असं म्हणत नितेश राणेंनी एका विशिष्ट समाजावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. तर नितेश राणे यांनी केलेल्या मागणीनंतर यासंदर्भात सरकार निर्णय घेईल, असे म्हणत शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Dec 11, 2024 03:49 PM