Nitesh Rane यांनी नाव न घेता विरोधकांना दिला इशारा, म्हणाले, ‘करारा जवाब मिलेगा..’
VIDEO | 'आता सर्व कारनामे बाहेर येणार असल्याने भीतीने फडफड होतेय अन् घाबरले आहेत. तुमचे सगळे पाप बाहेर येण्याची वेळ आली आहे,' भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर रोख असल्याचे पाहायला मिळत आहे. तर यावेळी त्यांनी इशारा देखील दिलाय
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. मात्र काही नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी भाष्य करत विरोधकांवर टीका केली आहे. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक झाल्यानंतर मातोश्रीपासून संजय राऊत यांच्या सर्वांची झोप उडाली आहे. महाविकास आघाडीच्या काळात रश्मी शुक्ला यांना अटक करायची होती. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्यापर्यंत यांची हिमंत गेली होती. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. त्यामुळे आता यांचे सर्व कारनामे बाहेर येणार आहेत. त्यामुळे भीतीने फडफड होते घाबरलेले आहेत. तुमचे सगळे पाप बाहेर येण्याची वेळ आली आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी इशारा दिला आहे. तर खिचडी घोटाळ्याबाबत नोटीस आली असताना संजय राऊत म्हणताय, आम्ही खिचडी घोटाळा केला नाही गोरगरिबांना मोफत खिचडी वाटली. मग सुजित पाटकर आणि तुझे काय संबंध होते मग पाटकर तुमच्या लहान भावाचं आणि मुलीचं नाव का घेतोय? असा सवालही नितेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.