Special Report | पुढचा नंबर अजित पवारांचा? भाजपचे नेते मोहीत कंबोज यांच्या ट्विटमुळे खळबळ

Special Report | पुढचा नंबर अजित पवारांचा? भाजपचे नेते मोहीत कंबोज यांच्या ट्विटमुळे खळबळ

| Updated on: Aug 17, 2022 | 9:46 PM

सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये होतं. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. कंत्राट वाटपात अनियमितता, नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं कॅगनंही म्हटलं 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगनं म्हटलं. 2019 मध्ये फडणवीसांसोबतच्या शपथविधीआधीच अजित पवारांना क्लीनचिट मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

मुंबई : भाजपचे नेते मोहीत कंबोज(BJP leader Mohit Kamboj ) यांनी 5 ट्विटनं खळबळ उडवून दिलीय. सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करा, अशी मागणी करुन आता कंबोज यांनी अजित पवारांकडे(Ajit Pawar) नाव न घेता बोट दाखवलंय. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा गाजला होता…भाजपनं, विशेषत: फडणवीसांनी आरोपांची राळ उठवली होती.1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला.
सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये होतं. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. कंत्राट वाटपात अनियमितता, नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं कॅगनंही म्हटलं 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगनं म्हटलं.
2019 मध्ये फडणवीसांसोबतच्या शपथविधीआधीच अजित पवारांना क्लीनचिट मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या. महाविकास आघाडी सरकार येताच 19 डिसेंबर 2019 ला तत्कालीन ACBचे महासंचालक परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांना क्लीन चिट दिली. हाच क्लीन चिटचा अहवाल हायकोर्टात प्रलंबित आहे. अजून हा अहवाल हायकोर्टानं स्वीकारलेला नाही त्यातच आता, मोहित कंबोज यांनी सूचक इशारा दिलाय. त्यामुळं पुढं काय होतं तेही कळेल.

Published on: Aug 17, 2022 09:46 PM