Mohit Kamboj | अनिल देशमुख दाऊदच्या गुंडासोबत काय करत होते? – मोहित कंबोज
कोरोनाच्या काळात दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सह्याद्रीवर गेला होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत त्याची गुप्त मिटिंगही झाली होती. या बैठकीला राज्याच्या एका मंत्र्याचा जावईही उपस्थित होता. तसेच सुनील पाटीलही यावेळी हजर होते, असं फोटो काढणाऱ्याचं म्हणणं आहे.
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या साथीरासोबत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुप्त मिटिंग झाली होती. देशमुख दाऊदच्या साथीदारासोबत काय करत होते? या दोघांमध्ये कोणती डिलिंग सुरू होती? असा सवाल भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सनसनाटी आरोप केला. कोरोनाच्या काळात दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सह्याद्रीवर गेला होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत त्याची गुप्त मिटिंगही झाली होती. या बैठकीला राज्याच्या एका मंत्र्याचा जावईही उपस्थित होता. तसेच सुनील पाटीलही यावेळी हजर होते, असं फोटो काढणाऱ्याचं म्हणणं आहे. तसेच ड्रग्ज पेडलरांना संरक्षण देण्यासाठी किती हप्ता घ्यायचा याची डिलिंग सह्याद्रीवर चालू होती, असंही फोटो काढणाऱ्याचं म्हणणं असल्याचा दावा कंबोज यांनी केला.
Latest Videos