उद्धव ठाकरे यांच्या फ्रंट मॅनला अटक, मोहित कंबोज यांचं नेमकं ट्विट काय?

उद्धव ठाकरे यांच्या फ्रंट मॅनला अटक, मोहित कंबोज यांचं नेमकं ट्विट काय?

| Updated on: Mar 20, 2023 | 8:17 PM

VIDEO | भाजप नेते मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरे यांना पुन्हा इशारा, उद्धव ठाकरे यांना केला डिवचण्याचा प्रयत्न

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनिल जयसिंघानी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील बुकी अनिल जयसिंघानी याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली. अशातच अनिल जयसिंघानी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानी यांचे नेमके कोणते संबंध आहेत या चर्चांना देखील आता उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. तर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे फ्रंट मॅन अनिल जयसिंघानी याला अटक अशा शब्दात मोहीत कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भातील ट्विट करून पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बघा मोहित कंबोज यांनी नेमकं काय ट्विट केलंय…

Published on: Mar 20, 2023 08:17 PM