मोहित कंबोज यांचा अटकपूर्व जामीन 27 जूनपर्यंत वाढवला

मोहित कंबोज यांचा अटकपूर्व जामीन 27 जूनपर्यंत वाढवला

| Updated on: Jun 13, 2022 | 2:19 PM

भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. कथित बँक गैरव्यवहार प्रकरणा कंबोज यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मोहित कंबोज यांचा अटकपूर्व जामीन 27 जूनपर्यंत वाढवला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. कथित बँक गैरव्यवहार प्रकरणी कंबोज यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मोहित कंबोज यांचा अटकपूर्व जामीन 27 जूनपर्यंत वाढवला आहे. मुंबई सत्र न्यायालयात 27 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (Indian Overseas Bank) व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने भाजप नेते मोहित कंबोज यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. बँक व्यवस्थापकाने मोहित कंबोजवर आरोप केला आहे की, मोहित कंबोज हे एका कंपनीवर संचालक म्हणून काम करतात. कंपनीच्या तीन संचालकांपैकी ते एक असल्याने त्यांनी 52 कोटींचे कर्ज बँकेकडून घेतले होते. मात्र ते कर्ज ज्या कारणासाठी त्यांनी घेतले होते, त्या कामासाठी त्यांनी ते पैसे वापरले नाहीत. त्या पैशाचा इतर ठिकाणीच त्यांनी वापर केला आहे.

Published on: Jun 13, 2022 02:19 PM