‘नावात विजय, मात्र शब्द उच्चारताच त्यात पराभव…’, नारायण राणेंचा रोख कुणावर?
भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान, नारायण राणेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीकास्त्र डागलं
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायणे राणे यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. दरम्यान, पुतळा कोसळल्याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे, मात्र या चौकशीत काहीतरी लपवलं जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “काय बोलणार विजय वडेट्टीवारला, फक्त नावात विजय आहे. मात्र शब्द उच्चारताच त्यात पराभव दिसतो. कशाला लपवून ठेवणार आपटेला? तुला सर्व मिळणार माहिती, तू विरोधी पक्षनेता आहेस आणि माझा चेला, असे प्रश्न विचारतो याचं दुःख मला वाटतं”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.