उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते तर..., नारायण राणे यांची सडकून टीका

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते तर…, नारायण राणे यांची सडकून टीका

| Updated on: Mar 30, 2023 | 7:56 PM

VIDEO | पुणे दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल, काय म्हणाले बघा

पुणे : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे काय राहिले आहे आता? ठाकरे संपले? ठाकरे याचं काहीच राहिलं नसून मातोश्री फक्त राहिली आहे, यापूर्वी ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळी ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. दरम्यान पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, पुण्यात अनेक प्रश्न आहेत. तरी मला ठाकरे गटाबद्दल का प्रश्न विचारले जात आहे. ठाकरे गट, मातोश्री, एवढेच महाराष्ट्र आणि भारत आहे का? असे म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

Published on: Mar 30, 2023 07:53 PM