Narayan Rane : ‘…तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू’, नारायण राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला सज्जड दम
वैभव नाईक यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नारायण राणे यांच्याकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. 'विमानतळाला टाळे ठोकून दाखव तुझ्या घराला टाळं ठोकू', असा प्रतिइशारा नारायण राणेंनी दिला आहे.
रत्नागिरीतील चीपी विमानतळावरून ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात जुपंल्याचे पाहायला मिळत आहे. चिपी-मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करा, नाहीतर विमानतळाला टाळं ठोकणार असा इशारा वैभव नाईक यांनी दिला. वैभव नाईक यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नारायण राणे यांच्याकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. ‘विमानतळाला टाळे ठोकून दाखव तुझ्या घराला टाळं ठोकू’, असा प्रतिइशारा नारायण राणेंनी दिला आहे. चिपी विमानतळाला टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळे ठोकेन, असा सज्जड दम खासदार नारायण राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिला आहे. चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणारी विमान वाहतूक येत्या पंधरा दिवसात सुरू न झाल्यास चिपी विमानतळाला टाळे ठोकणार अशा पद्धतीचा इशारा वैभव नाईक यांना प्रशासनाला दिला होता. वैभव नाईक यांच्या या इशाराचा नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी वैभव नाईक यांच्यावर एकेरी टीका करताना टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळं ठोकलं नाही तर बघच असा दम सुद्धा नारायण राणे यांनी यावेळी भरलाय.