नारायण राणे यांची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून 4 जणांना अटक, प्रकरण नेमकं काय?

नारायण राणे यांची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून 4 जणांना अटक, प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Jan 04, 2025 | 2:14 PM

एका महिलेला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली हा फसवणुकीच्या प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते नारायण राणे यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल ४५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्सोवा येथे ही घटना घडली असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांन याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत. एका महिलेला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली हा फसवणुकीच्या प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेकडून आरोपींनी ४५ लाख रूपये उकळल्याचा आरोप आहे. मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका, राकेश गावडे, अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ५१ वर्षांची असून ती अंधेरी येथे राहते, ती एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्यांना २३ वर्षांची मुलगी असून तिने ऑक्टोबर २०२० साली नीट परीक्षेत ३१५ गुण मिळवले होते. सध्या ती मुलगी बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. पीडित महिला ही मार्च २०२१ मध्ये त्यांच्या मुलीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. यादरम्यान, त्याची फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Jan 04, 2025 01:58 PM