Narayan Rane | बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, फोटो पण नीट दिसत नाही : नारायण राणे

Narayan Rane | बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, फोटो पण नीट दिसत नाही : नारायण राणे

| Updated on: Aug 20, 2021 | 2:57 PM

शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा. स्मृती स्थळ दलदलीत आहे. आधी ते पाहा. मग शुद्धीकरण करा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा, असा हल्ला नारायण राणे यांनी चढवला.

नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करावा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा. मग कारभार करा, असं राणे म्हणाले.