‘EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, हिंदूत्वावर भाष्य करताना भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
नितेश राणे यांच्याकडे भाजपमधील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिले जाते. कारण गेल्या काही दिवसात नितेश राणे आवर्जून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाष्य करताना दिसून येत आहे. आजही सांगलीच्या दौऱ्यावर असताना नितेश राणे यांनी भाषण करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला.
भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत भाजपच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नितेश राणे यांच्याकडे भाजपमधील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिले जाते. कारण गेल्या काही दिवसात नितेश राणे आवर्जून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाष्य करताना दिसून येत आहे. आजही सांगलीच्या दौऱ्यावर असताना नितेश राणे यांनी भाषण करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला. यावेळी नितेश राणे यांनी विरोधकांच्या टीकेवर भाष्य केले आहे. ईव्हीएम मशीनमुळे महायुतीचा विजय झाला अशी सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना नितेश राणेंनी सडतोड उत्तर दिले आहे. इतकंच नाहीतर नितेश राणेंनी विरोधकांना ईव्हीएमचा वेगळाच अर्थही स्पष्ट करून सांगितला आहे. ‘हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार आपण स्पष्ट ठेवले पाहिजे. ईव्हीएमच्या नावाने विरोधक बोंब मारत आहेत. त्यांना ईव्हीएमचा अर्थच कळला नाही ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला… असं वक्तव्य नितेश राणे यांनी सांगलीत केल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला आपल्या भाषणातून लक्ष्य केल्याचं दिसून आल आहे. बघा काय म्हणाले नितेश राणे?