सरपंचपदाची निवडणुकही न लढलेले राऊत आचारसंहितेवर बोलतात हा मोठा..., भाजप नेत्याचा खोचक पलटवार

सरपंचपदाची निवडणुकही न लढलेले राऊत आचारसंहितेवर बोलतात हा मोठा…, भाजप नेत्याचा खोचक पलटवार

| Updated on: Apr 01, 2024 | 3:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा खर्च भाजप करत असेल आणि सरकारी पैशातून खर्च म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला. तर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारी पैशातून प्रचार करत आहेत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याचा खर्च भाजपने करायला हवा. पण त्यांच्या दौऱ्याचा खर्च भाजप करत असेल आणि सरकारी पैशातून खर्च म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला. तर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राऊतांनी आधी आचारसंहितेचे नियम समजून घ्यावेत, मग टीका करावी असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. सरपंचपदाची निवडणुकाही न लढलेले राऊत आचारसंहितेवर बोलतात हा मोठा विनोद आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Apr 01, 2024 03:41 PM