कैदी नंबर 8959 कोर्टात जाणार, नाव न घेता नितेश राणे यांचा कुणाला इशारा

कैदी नंबर 8959 कोर्टात जाणार, नाव न घेता नितेश राणे यांचा कुणाला इशारा

| Updated on: May 10, 2023 | 2:57 PM

VIDEO | अलिबागमध्ये किती मराठी लोकांच्या जमिनी बळाकावल्यात, याचा हिशोब द्यावा; नितेश राणेंचा कुणाला सवाल?

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेत जोरदार टीका केली. तसेच राऊत हा सर्वा मोठा लँड माफिया आहे. तर उद्धव ठाकरे सातत्याने दंगली भडकवण्याचा आरोप करतायेत. यावरच भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांनी अलिबागला एक प्लॉट मराठी कुटुंबीयांकडून कवडीमोल भावाने दमदाटी करुन विकत घेतला. किती लोकांच्या जमिनी बळाकावल्या आहेत याचा हिशोब संजय राऊत यांनी द्यावा. संजय राऊत हा सर्वात मोठा लँड माफिया असे म्हणत नितेश राणे यांनी थेट संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. तर आमच्या लोकांवर तोंडसुख घेण्यापेक्षा तुझे बघ, असा इशाराच राणे यांनी पुन्हा राऊत यांना दिला. तर कैदी नं 8959 संजय राऊत आज बेलवर बाहेर आहे. गेल्या 9 महिन्यांपासून संजय राऊत अशांतता पसरवण्याचे काम करत आहे. बेळगावच्या मतदारांनी संजय राऊत यांचे ऐकून चुकीच्या माणसाला मतदान करु नका, असे म्हणत नितेश राणे यांनी जनतेला आवाहन केले आहे.

Published on: May 10, 2023 02:56 PM