भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका; म्हणाले, ‘ठाकरेंना आम्ही…’
VIDEO | उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर भाजप नेत्याचं सडेतोड प्रत्युत्तर, काय म्हणाले बघा व्हिडीओ
रत्नागिरी : उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत. बारसूच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी बारसू-सोलगाव येथील आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले हा प्रकल्प जर हुकूमशाही पद्धतीने लादला तर महाराष्ट्र पेटवू असे म्हणत विरोधकांना इशारा दिला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणे म्हणाले, महाराष्ट्र पेटवण्यासाठी त्यांच्याकडे माचिसही नाही आणि त्यांची कुवतही नाही. हे कोकणाला पेटवायला आले आहे. जमीन मिळावी प्रकल्प व्हावा यासाठी उद्धव ठाकरे यांनीचं केंद्राकडे पत्र पाठवलं आणि आज तेच पेटवा-पेटवीची भाषा करताय. जे काही विकास राज्यात करायचा आहे. तो भाजप आणि शिंदे यांची शिवसेना करेल, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला आम्ही किंमत देत नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल बारसुत आलेला आहे. उद्धव ठाकरे मन की बात समजतात की धन की बात समजतात हे त्यांनी सांगावं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्र लिहून बारसुत रिफायनरी व्हावी म्हणून पत्र काढलं. आता विरोध करता आहेत…..हा नेमका विचार कसा बदलला? हा विचार कोकणच्या विकासासाठी नाही बदलला तर मातोश्रीवर पैसे आले पाहिजेत म्हणून बदलला आहे, असे दलाल कोकणात येऊ द्यायचे का? असा सवालही निलेश राणे यांनी कोकणवासियांनी केला.