Nitesh Rane यांचा ‘या’ नेत्याबद्दल मोठा दावा, शरीराने केवळ ठाकरेंसोबत मात्र मनाने शिंदेंसोबत
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल, नितेश राणे यांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, 'जो आमदार सकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात करतो. त्याने आम्हा लोकांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये. '
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गट हा लवकरच भाजपामध्ये विलीन होईल, असे भाष्य वैभव नाईक यांनी केले. तर एकनाथ शिंदे यांना दसरा मेळावा घ्यायचा असेल तर तो त्यांनी तो भाजपाच्या कार्यालयातून घ्यावा, असे म्हणत वैभव नाईक यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेवर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे म्हणाले, जो आमदार सकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात करतो. त्याने आम्हा लोकांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये. जे सकाळचा नाश्ता एकनाथ शिंदे यांच्या घरात करतात आणि रात्री निघताना वर्षावरून निघतात, अशा वैभव नाईक यांनी त्यांचा पूर्ण दिनक्रम उद्धव ठाकरे यांना दाखवावा. वैभव नाईक हे केवळ शरीराने ठाकरेंसोबत आहेत. ते मनाने कधीच एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत, असा सणसणीत दावा नितेश राणे यांनी केला आहे.