Sanjay Raut यांची ‘या’ नेत्यानं काढली लायकी, साधं ग्रामपंचायत सदस्य बनण्याची लायकी नाही अन्…
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले, देवेंद्र फडणवीस यांच्या कपॅसिटीबद्दल संजय राऊत यांनी भाष्य केले, यावर भाजप नेते नितेश राणे प्रत्युत्तर दिलं आहे. बघा काय म्हणाले...
सिंधुदुर्ग, ९ ऑक्टोबर २०२३ | कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीसांना हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही, असे म्हणत थेट सामनातून हल्लाबोल केलाय. कोणीतरी ऐरागैरा उठतो आणि फडणवीसांची लायकी काढतो, असे म्हणत संजय शिरसाट यांना संजय राऊत यांनी डिवचलं होतं. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची लायकीबद्धल राऊत बोलला. कोणी कोणाची लायकी काढली आणि कोण बोललं तर चालेल का? रश्मी ठाकरेंना सामनाचा संपादक बनवून राऊतची लायकी काढली असं बोललं तर चालेल का? साधा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची लायकी नाही तो मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघतो. उद्धव ठाकरेंनी याची लायकी ओळखली आणि त्याला सत्तेच्या काळात राज्य मंत्री पण बनवले नाही, अशी सडकून टीका केली असून संजय राऊत यांची त्यांनी लायकीच काढल्याचे बघायला मिळाले.
Published on: Oct 09, 2023 10:51 PM
Latest Videos