‘सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम…’, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल अन् घेतलं फैलावर
सर्वपक्षीय नेत्यांसह सुरेश धसांकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील काही काही भागात मोर्चांचं नियोजन...
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांसह सुरेश धसांकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील काही काही भागात मोर्चा काढण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजप नेते पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर बीड जिल्ह्याची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालंय, इकतंच नाहीतर बीड हत्या प्रकरणात राजकारण न आणता संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळावलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. पुढे त्या असंही म्हणाल्यात, धस यांच्यावर काय बोलू? मी कुठं गप्प आहे. मी एसआयटीची मागणी केली होती. पहिली मागणी मी केली. माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आत जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही. मागच्या 2 वर्षात का बोलले नाही, असा सवाल पंकजा मुंडे यांनी सुरेश धसांना केला. तर पंकजा मुंडे यांच्यावर आरोपावर सुरेश धसांनी पलटवार केलाय. आम्ही कुठे बदनाम करतोय? परळीचा पॅटर्नही तुमचाच आहे, असा उलट सवाल सुरेश धसांनी केलाय.