‘मी जरी विरोधी पक्षात असते तरी…’, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे होत्या. यावेळी त्यांनी बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारासह राज्यातील वाढत्य महिला अत्याचारावर बोलताना संताप व्यक्त केला. बघा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
निर्भया प्रकरणापासून ते बदलापूर प्रकरणापर्यंतच्या महिला अत्याचारामध्ये क्रृरता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रृरता आणि अशा क्रृरतेवर दिल्या जात असलेल्या शिक्षेवर आपण लक्ष दिलं पाहिजे, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. तर महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सामाजिक दृष्टीकोनातून बघून त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकरणावर बोलताना किंवा त्यासंदर्भात कोणतंही राजकारण केले नाही पाहिजे आणि मी जरी विरोधीपक्षात असते तर याचं राजकारण केलं नसतं, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, माझ्यासाठी हा विषय अत्यंत संवेदनशील आणि हृदयाला पिळवटून टाकणारा विषय आहे. महिला अत्यारातील आरोपी आणि अशा नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, राज्यातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत बोलताना पकंजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.