पंकजा मुंडे अन् जरांगे पाटील काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे, मराठवाड्याची दिशा ठरवणार

पंकजा मुंडे अन् जरांगे पाटील काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे, मराठवाड्याची दिशा ठरवणार

| Updated on: Oct 11, 2024 | 11:41 AM

बीडमध्ये एकाच दिवशी दोन मोठे दसरा मेळावे होणार आहेत. सावरगावात पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आणि नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा दसरा मेळावा...

दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगावात दसरा मेळावा होणार आहे. पण त्यासोबतच पहिल्यांदाच नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. मराठा-ओबीसीच्या वादात दोन दसरा मेळावे मराठवाड्याची दिशा ठरवणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा सावरगावात होत आहे. मात्र मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच दसरा मेळावा घेणार आहे. मराठा-ओबीसीमध्ये वाद झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच असे दोन मेळावे होत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मात्र सरसकट मराठ्यांना ओबीसी करण्यास सरकारचा नकार आहे. मात्र त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुती विशेषतः भाजपला बसला. दरम्यान, आता होणाऱ्या दसरा मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे देखील बोलतील तर मनोज जरांगे पाटीलही बोलतील. तर जरांगे पाटील आतापासूनच सत्तेवर नागंर फिरवण्याचा इशारा देतायतं., बधा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 11, 2024 11:40 AM