Special Report | पंकजा मुंडे यांची गडकरींशी भेट, नाराजीवरून चर्चा थेट?

| Updated on: Oct 20, 2021 | 9:31 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज अचानक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तब्बल तासभर ही भेट चालली. त्यानंतर पंकजा यांनी मीडियाशी संवाद साधला

नवी दिल्ली: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. या भेटीत बीड जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज अचानक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तब्बल तासभर ही भेट चालली. त्यानंतर पंकजा यांनी मीडियाशी संवाद साधला. या भेटीत राजकीय चर्चा झाली का? असा सवाल पंकजा यांना करण्यात आला. त्यावर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.