Special Report | शरद पवारांची टीका…पंकजांचा चिमटा
पंकजा मुंडे काही मोठ्या नेत्या नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भर पत्रकार परिषदेत म्हणाले. पवारांच्या याच टीकेला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनीदेखील त्यांच्या शैलीत चिमटा काढला आहे.
पंकजा मुंडे काही मोठ्या नेत्या नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भर पत्रकार परिषदेत म्हणाले. पवारांच्या याच टीकेला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनीदेखील त्यांच्या शैलीत चिमटा काढला आहे. मी पवार साहेबांचं वक्तव्य मोबाईलवर पाहिलं. त्यांचं बरोबर आहे, मी एवढी मोठी नेता नाही. मी लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे, असं मी शिकली आहे. ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशीच आहे. बाकी ते आमच्यापेक्षा मोठेच आहेत, त्यात काही वादच नाही’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Published on: Oct 17, 2021 10:59 PM
Latest Videos